वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या 2023 च्या इंडिया खुल्या पुरुष आणि महिलांच्या 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत डेन्मार्कच्या टॉप सीडेड व्हिक्टर ऍक्सेलसन तसेच माजी विश्व कनि÷ चॅम्पियन कुनलावॅट विटीडसार्न यांनी पुरुष एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे. गेल्या वषी या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविणाऱया सिंगापूरच्या लोह किन येवचे तसेच चीनच्या लि फेंग यांचे आव्हान समाप्त झाले. जपानच्या यामागुची आणि ऍन सी यंगने पुढील फेरीत प्रवेश मिळविला.
पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात विटीडसार्नने सिंगापूरच्या येवचा 21-12, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. डेन्मार्कच्या टॉप सीडेड व्हिक्टर ऍक्सेलसनने पुरुष एकेरीची उपांत्यफेरी गाठली. त्याचा प्रतिस्पर्धी रेसमुस गिमेकी याला दुखापत झाल्याने त्याने हा सामना सोडून दिला. रेसमुसला व्हिलचेअरमधून मैदानाबाहेर नेण्यात आले. इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित अँथोनी गिनटिंगने चीनच्या लि चा 21-11, 17-21, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. नवी दिल्लीतील ही स्पर्धा भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित केली आहे.
या स्पर्धेत महिला एकेरीच्या सामन्यात जपानच्या अकेनी यामागुचीने स्पेनच्या कॅरोलिना मॅरीनचा 21-17, 14-21, 21-9 असा पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले. आता यामागुचीचा पुढील फेरीतील सामना थायलंडच्या सुपिंदा कॅटेथलाँगशी होणार आहे. थायलंडच्या कॅटेथलाँगला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पुढे चाल मिळाली. कारण तिची प्रतिस्पर्धी चीनची चेन फेई प्रकृती नादुरुस्तीमुळे खेळू शकली नाही. दक्षिण कोरियाची ऍन से यंग आणि चीनची बिंगजाओ यांच्यात उपांत्यफेरीचा दुसरा सामना होईल.