अंजुमन कॉलेजच्या आवारातील ईदगाह मैदानावर नमाज पठण
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व परिसरात बकरी ईद बंधूभावाने साजरी करण्यात आली. प्रेम आणि बलिदान याचे प्रतीक असणारा बकरी ईद सण रविवारी मुस्लीम बांधवांनी साजरा केला. कोर्ट कंपाऊंडशेजारी असणाऱया ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मागील दोन वर्षांत मोठय़ा प्रमाणात बकरी ईद साजरी झाली नव्हती. त्यामुळे यावषी नमाज पठणासाठी मोठय़ा संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते.
मुस्लीम धर्मियांचा महत्त्वाचा असणारा बकरी ईद सण दरवषी मोठय़ा उत्साहात साजरा होतो. बेळगाव परिसरात असणाऱया विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात येते. परंतु, मागील दोन वर्षांत कोरोनामुळे सामूहिक नमाज पठण करण्यात आले नव्हते. मशिदींमध्येच टप्प्याटप्प्याने नमाज पठण करावे लागले होते. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावषी सामूहिक नमाज पठणाला परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार अंजुमन कॉलेजच्या आवारात असणाऱया ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले. सकाळी 8 पासून 10 पर्यंत मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले. धर्मगुरुंनी मुस्लिमांना संदेश देत सर्व धर्मियांशी सलोख्याचे संबंध ठेवावे, असे सांगितले. कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर होऊन सर्वांना उत्तम आरोग्य मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी केली. ईदगाह मैदानावर प्रशासकीय अधिकारी, राजकीय व्यक्ती शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत्या.