Bamboo businessman Gangaram Rane passed away
विलवडे येथील येथील प्रसिध्द बांबु व्यावसायिक गंगाराम रामा राणे (६७) यांचे पहाटे हृदविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाचा राणे कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्काच बसला. गावच्या सामजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे, जावई असा परीवार आहे. येथील विशाल राणे यांचे ते वडील होत तर राष्ट्रपती पोलीस पदक विजेते परशुराम राणे यांचे ते भाऊ होत.
ओटवणे / प्रतिनिधी