Banda Police action against Goa-made liquor traffic
बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीच्या विरोधात दोन कारवाया करत तब्बल ८ लाख ९८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही कारवायात दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पहिली कारवाई बांदा बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या पुलाखाली पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. नारायण विठ्ठल ठाकर (वय ५५, रा. बांदा जुना स्टॅन्ड ) हे मोठ्या पिशवीतून गोवा बनवटीच्या दारूचा खोक्याची पायी चालत वाहतूक करत होते. पोलिसांनी झडती घेत गोवा बनावटीचा नॅशनल कमांडर ट्रिपल एक्स ब्रँडचा २ हजार ४०० रुपये किमतीचा एक खोका जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी ठाकर याचेवर कारवाई करण्यात आली.
प्रतिनिधी
बांदा