मुंबई
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्ज वितरणाच्याबाबतीत पाहता बँक ऑफ महाराष्ट्र यांनी चांगले प्रदर्शन केले असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कर्ज आणि ठेवींच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवत महाराष्ट्र बँकेने आघाडी घेतली आहे. पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या महाराष्ट्र बँकेने 31 मार्च 2022 अखेर समाप्त झालेल्या आर्थिक वर्षामध्ये कर्ज वितरणात 26 टक्के वाढ दर्शवत उत्तम कामगिरी निभावली आहे. यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक कर्ज आणि ठेवींच्या बाबतीमध्ये दुसऱया क्रमांकावर राहिली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया ही तिसऱया स्थानी राहिली आहे.