मिरवणुक मार्गावर 12 तर काही मंडळांतर्फे ही सीसीटीव्ही
प्रतिनिधी/ सातारा
गणेशोत्सवाची तयारी सध्या सर्वत्र धुमधडक्यात सुरू आहे. याच पाश्वभुमीवर शहरातील विविध मार्गावर 12 दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
मिरवणूक मार्गावरील महत्वाच्या 12 ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने विसर्जन तलावाच्या ठिकाणी व अधिक प्रमाणात गर्दी होणाऱया ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात येणर आहेत.
नगरपालिकेच्यावतीने एका खासगी कंपनीकडुन हे कॅमेरे भाडे तत्वावर घेण्यात येणार असुन पोलिसांच्या सूचनेनुसार त्या-त्या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे उत्सव काळात घडणाऱया अनुचित घटनांवर चांगलाच आळा बसणार आहे. तसेच पोलीस प्रशासनाचा वॉच ही चांगलाच असणार आहे.
प्रशासनातर्फे शहरातील विविध भागात एकुण 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पण हे कॅमेरे उच्च दर्जेदार पध्दतीचे नाहीत. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या पाश्वभुमीवर दर्जेदार असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. तसेच शहरातील काही मंडळांच्या वतीने ही मंडप आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाचा बाप्पांचा उत्सव हा सीसीटीव्हीच्या नजर कैदेत पार पडणार हे नक्की.