शाहुवाडी, प्रतिनिधी
Kolhapur Rain Update News : शाहुवाडी तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. वर्षा पर्यटनासाठी अनेक पर्यटक बर्की धबधब्याकडे जात आहेत. मात्र कासारी नदीतील पाणी वाढले आहे.यामुळे बर्की पूल पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील सर्व वाहतुक बंद असून, पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. शनिवारी, रविवार सुट्टी दिवशी येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रात पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे धबधबे ओसंडून वाहत आहेत. वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी विविध भागातून पर्यटक येतात. मात्र, सदर ठिकाणी जाण्याच्या मार्गावर पाणी आल्याने या मार्गावर बंदी घालण्यात आली आहे. अनुस्कुरा बरकी या मार्गावर डायरेक्ट लावून शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांच्यासह वन विभाग व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .
दरम्यान, पर्यटकांनी अशा स्थितीमध्ये कोणताही धोका पत्करू नये व पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी केले आहे .