दरवषी विविध स्पर्धा भरवून प्रोत्साहन देणाऱया तरुणांचे कार्य कौतुकास्पद : विजेत्या स्पर्धकांचा बक्षिसे देऊन सत्कार
वार्ताहर /सांबरा
बाळेकुंद्री खुर्द येथे बाल शिवाजी युवक मंडळ आयोजित एका माणसाने बैलगाडी ओढण्याच्या शर्यतीत बसवंत सुरेश पाटील याने खुल्या गटामध्ये सर्वाधिक 403 फूट अंतर ओढून प्रथम क्रमांकाचे 5001 रुपयांचे बक्षीस पटकाविले. द्वितीय-आदर्श चौगुले, तृतीय-नागेश जक्कण्णावर, चौथा-अक्षय निलजकर, पाचवा-सुनील पाटील व सहावा क्रमांक रणजीत पाटील याने पटकाविला.
60 किलो वजनाखालील गटामध्ये प्रथम-भुवन बरीगाल, द्वितीय-गोपाळ चौगुले, तृतीय-ऋतिक पाटील, चौथा-शिवकुमार तानशी व पाचवा क्रमांक तरुण हलगी याने पटकाविला.
माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले व बैलगाडी ओढून स्पर्धेचे उद्घाटन केले. याप्रसंगी ता. पं. माजी सदस्य सुनील अष्टेकर यांनी श्रीफळ वाढविले. पुंडलिक पावशे यांनी लहान गाडीचे पूजन केले.
बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. माजी अध्यक्ष प्रशांत जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा. पं. माजी सदस्य सुरेश पाटील, बाळासाहेब पाटील, मनोज पाटील उपस्थित होते. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले, अशा स्पर्धा होणे गरजेचे असून येथे दरवषी विविध स्पर्धा भरवून तरुणांना प्रोत्साहन दिले जाते. येथील तरुणांचे कार्य कौतुकास्पद आहे. तर ग्रा. पं. माजी अध्यक्ष प्रशांत जाधव म्हणाले की, गावात अशा स्पर्धा होत असल्याने समाजात एकीची भावना वाढीस लागते व अशा स्पर्धेमधून युवकांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. युवकांनी अशा स्पर्धांचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेऊन आपले कौशल्य दाखवावे. हल्ली युवकांचे शारीरिक श्रम कमी होत असल्याने त्यांचे आरोग्य ढासळत चालले आहे. यासाठी अशा स्पर्धा भरविणे गरजेचे आहे.
विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ पाटील, बसवंत पाटील, ऋतुराज जाधव, सुरज जाधव, दिगंबर पाटील, सुनील पाटील, राकेश पाटील, ओमकार पाटील, प्रतीक जाधव, नील पाटील, स्वप्निल पाटील, धैर्यशील जाधव आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. युवराज पाटील यांनी आभार मानले.