सावंतवाडी / प्रतिनिधी –
देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय व महाराष्ट्र उद्योजकता विकास (MCED) सिंधुदूर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना उद्योजकता या विषयावर संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास याचे महाव्यवस्थापक श्री. श्रीपाद दामले उपस्थित होते .त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे असलेल्या महाराष्ट्र शासनाचे व केंद्र सरकारचे विविध माहिती विवीध प्रकारचे असलेल्या बीज भांडवल त्याचबरोबर सबसिडी याची सर्वांगीण माहिती विद्यार्थ्यांना दिली. देशाच्या आर्थिक विकासासाठी उद्योजकतेला देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि यासाठी ही आपल्यासारखी युवाशक्तीने पुढाकार घेतल्यास ते सहज शक्य होईल असे संबोधित केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य यशोधन गवस यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक पंडित सर व आभार प्रदर्शन विद्यार्थी सिद्देश तळवडेकर याने केले..