बेळगाव : राज्य सरकारने बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे प्रादेशिक आयुक्तपदाचा अतिरिक्त पदप्रभार सोपविला आहे.
नुकताच प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ सेवा निवृत्त झाले होते. त्यानंतर उत्तर कना&टकातील महत्त्वाचे मानले जाणारे हे पद वरिष्ठ अधिकारी म्हणून बागलकोट जिल्हाधिकारी सुनील कुमार यांच्याकडे भार सोपविण्यात आला होता. मात्र, सुनील कुमार यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होते.
नितेश पाटील हे बेळगावाचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या कार्यालया शेजारीच प्रादेशिक आयुक्त कार्यालय आहे. त्यामुळे पाटील यांच्याकडे पदभार दिल्याने सोयीचे ठरणार आहे.