क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य अबकारी खाते व उतर कर्नाटक अबकारी खात्याच्या संयुक्त विद्यमाने उत्तर कर्नाटक अधिकारी विभागय क्रीडा स्पर्धेत बेळगाव विभागाने 84 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपट, 28 गुणांसह होस्पेट उपविजेतेपद तर 16 गुणांसह कलबुर्गी विभागाने दुसरे उपविजेतेपद पटकाविले. ट्रकमध्ये बळ्ळारीने प्रथम, बेळगाव दक्षिणने द्वितीय तर हावेरीने तृतिय क्रमांक पटकाविला.
पुरूषांच्या कब्बड्डी स्पर्धेत बेळगाव अ विजेता, बेळगाव बी उपविजेता. क्रिकेट बेळगाव अ विजेता तर होस्पेट अ उपविजेता. व्हॉलिबॉल बेळगाव अ विजेता, बेळगाव ब उपविजेता. टग ऑफ फॉर पुरूष गटात कलबुर्गी विभाग विजेता, बेळगाव विभाग उपविजेता. महिलांच्या गटात बेळगाव विभाग विजेता, कलबुर्गी विभाग उपविजेता. शटल बॅडमिंटन बेळगाव विभाग अ विजेता, बेळगाव विभाग ब उपविजेता. महिला गटात होस्पेट विभाग अ विजेता, होस्पेट विभाग ब उपविजेता. मॅरेथॉन स्पर्धेत विजय आजरे व रंगाचल विजेते, नंजेगौडा व एलएस सलागारे उपविजेते, महिला गटात पुष्पा गडद विजेती, कलबुर्गी रम्मा अंबरीश उपविजेती.
बक्षिस वितरण प्रसंगी अंमली पदार्थ विभागाचे विभागिय आयुक्त मोहनकुमार, उत्तर कर्नाटकाचे अबकारी विभाचे आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, उपायुक्त बसवराज हडपद, एस. एन. राजेंद्र प्रसाद, फिरोज किल्लेदार आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या बक्षिसे देण्यात आली.