बेळगाव/ क्रीडा प्रतिनिधी
बेंगळूर येथे साबू क्लासिक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी बेळगाव जिल्ह्याचा शरीरसौष्ठव संघ बेंगळूरला रवाना झाला आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी मास्टर्स दिव्यांग स्पर्धकांची निवड करण्यात येत आहे.
या स्पर्धेसाठी मास्टर गटात राजकुमार बोकडे, प्रताप कालकुंद्रीकर, चंदू बडवाण्णाचे, कलिंग उदय नाईक तर खुल्या स्पर्धेसाठी प्रताप कालकुंद्रीकर, मंदार देसाई, रोहित माळवी, मंथन धामणेकर, पवन धामणेकर, सुनील भातकांडे, सुहास दिवटे, प्रशांत खन्नूकर, रितीक लाखे, अल्ताफ किल्लेदार मोरेश देसाई, वैष्णव मजुकर, विशाल निलजकर, आदित्य पाटील, गजानन गावडे, प्रसाद बेळगावकर, विक्रांत सातवणेकर, गजानन काकतीकर, रोहन अल्लूर, उमेश गंगणे, महेश गवळी आदी शरीरसौष्ठवपटू बेंगळूरला रवाना होणार आहेत.