वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या चार देशांच्या पॅराबॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. प्रमोद भगतने एकेरी, पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीत अंतिम फेरी गाठली आहे तर सुकांत कदमने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या प्रमोद भगतने आपल्या देशाच्या कुमार नितेशचा केवळ 35 मिनिटांच्या कालावधीत सरळ गेम्समध्ये पराभव केला. आता प्रमोद भगत आणि ब्रिटन डॅनिल बेथेल यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांनी भारताच्या ऋतिक रघुपती व मानसी जोशी यांचा 21-12, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. त्यांचा अंतिम सामना इंडोनेशियाच्या रामदेनी आणि वोकटिलाशी होणार आहे. पुरुष दुहेरीच्या उपांत्य लढतीत टॉप सिडेड जोडी प्रमोद भगत आणि सुकांत कदम आणि कुमा नितेश व तरुण यांचा 21-19, 21-12 असा पराभव केला. त्यांचा अंतिम सामना दीपरंजन बिसोई