ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Bhupendra Patel took oath as Chief Minister of Gujarat भूपेंद्र पटेल यांनी आज गुजरातचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गांधीनगर सचिवालयाच्या हेलिपॅड मैदानावर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पटेल हे सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
पटेल यांच्यानंतर 16 मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. यामध्ये 8 कॅबिनेट मंत्री, दोन स्वतंत्र प्रभार आणि सहा राज्यमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
पटेल हे घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱयांदा निवडून आले आहेत. ते गुजरातमधील पाटीदार समाजातील एकमेव नेते आहेत, जे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. 15 महिन्यांपूर्वी त्यांना विजय रुपानी यांच्या जागी गुजरातची जबाबदारी देण्यात आली होती.
पटेल यांच्यासह शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावे
कॅबिनेट मंत्री : कनुभाई देसाई, ऋषिकेश पटेल, राघवजी भाई पटेल, बलवंत सिंह राजपूत, भानुबेन बावरिया, कुबेरभाई डिंडोर, कुंवरजी बावडिया, अय्यर मुलुभाई बेरा.
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार : हर्ष संघवी आणि जगदीश विश्वकर्मा
राज्यमंत्री : पुरुषोत्तम सोलंकी, बच्चूभाई खाबड, मुकेशभाई पटेल, प्रफुल्ल पानसेरिया, भीखूसिंह परमार, कुंवरजी भाई हडपति