वार्ताहर /किणये
बेळगाव ग्रामीण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थनार्थ व त्यांचा प्रचार करण्यासाठी किणये भागातील कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी भागात बाईकरॅली काढून जोरदार प्रचार केला. लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवडून आणण्याचे आवहनही यावेळी कार्यकर्त्यांनी केले. किणये, बहाद्दरवाडी, शिवनगर, रणकुंडये, कर्ले, नावगे, जानेवाडी आदी गावांमध्ये कार्यकर्त्यांनी दुचाकी वाहनावरून फिरून लक्ष्मी हेब्बाळकर यांचा प्रचार केला. लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा एकदा मतदान करून निवडून आणण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी केला. य् ाा रॅलीमध्ये या भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच काही महिलाही सहभागी झाल्या होत्या.