नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी रालोआ आणि बीजेडीमध्ये युती होऊ शकते. बीजेडी 15 वर्षांनंतर एनडीएमध्ये परतण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. बीजेडी अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एनडीएशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून ती अंतिम टप्प्यात आहे. बीजेडीच्या उपाध्यक्षांनी युतीसंबंधीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप देखील अंतिम झाले आहे. भाजप लोकसभेच्या वाढीव जागा लढवण्याची शक्मयता सूत्रांनी व्यक्त केली. त्याच वेळी, बीजेडी विधानसभा निवडणुकीत एकूण 147 जागांपैकी 100 हून अधिक जागा लढवणार असल्याचे बीजेडी आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले. बीजेडीचा रालोआमध्ये समावेश होण्यासंबंधीची अंतिम घोषणा लवकरच होऊ शकते, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवार आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठिंबा दिल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये युतीची चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नुकतीच भुवनेश्वर येथील आपल्या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. एनडीएमध्ये सामील होण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. दुसरीकडे, भाजप नेतृत्वाने दिल्लीत ओडिशाच्या नेत्यांशी संभाव्य युतीबाबत चर्चा केली.
Previous Articleबॉम्बस्फोटातील संशयिताविषयी महत्त्वाचे धागेदोरे एनआयएच्या हाती
Next Article लवकरच टाटा मोटर्सचे होणार विभाजन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.