Pankaja Munde : शिवशक्ती परिक्रमाच्या माध्यमातून पंकजा मुंडे राज्यातील सर्व शक्तीपीठे आणि ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेत आहेत. आज त्यांनी कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतले. सर्वसामान्य लोकांना कधीच काही कमी पडू नये अशी प्रार्थना पंकजा मुंडे यांनी केली असं मुंडे यांनी सांगितले.
भाजप नेत्या पंकजा मुंडे महाराष्ट्रात शिवशक्ती यात्रा करत आहेत.या यात्रेच्या माध्यमातून मुंडे राज्यातील सर्व शक्तिपीठे आणि ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत आहेत.या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.आज पंकजा मुंडे यांनी कोल्हापुरात अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाल्या की, मी आज अंबाबाईचे चरणी नतमस्तक झाले, सर्वसामान्य लोकांना कधीच काही कमी पडू नये असे मी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले.