बेळगाव : इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या वतीने घाण्यात आलेल्या विविध कलरच्या बेल्ट परिक्षत इंडियन कराटे 3 कराटेपटूनी ब्लॅक बेल्ट पटकाविला. मुचंडी येथील औदुंबर मंगल कार्यालय येथे कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण 75 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते. तर टॉप तीन ब्लॅकबेल्ट विद्यार्थी साहिल काकती, सिध्दार्थ मोदगे आणि रोहिणी ताशिलदार या तिन्ही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली. विद्यार्थ्यांना इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या, व प्रमुख पाहुणे संजु कुमार हुलकाय, लेफ्टनंट कर्नल तलुनवीरसिंग ढिल्लोन, अमित कोना, शशांक मिराशी, मुख्याध्यापिका ज्योती सुर्यवंशी, लक्ष्मण बुद्री, चनगौडा बरगावी, कराटे मास्टर गजेंद् काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅकबेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्या पालकांना सुद्धा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. वरील दोन्ही ब्लॅकबेल्ट विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक परशुराम काकती यांचे प्रशिक्षण लाभत आहे. तर ही परिक्षा यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर व प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर,विजय सुतार, निलेश गुरखा, हरीष सोनार,विनायक दंडकर, ,परशराम नेकनार, लक्ष्मीकांत आनंदाचे,कृष्णा जाधव , वचना देसाई, रितु चौगुले, संजु गस्ती, आदित्य तळवार, लक्ष्मण कुंभार, पार्थ चौगुले पाटील, किरण गडकर, सुमित काकती, जयकुमार मिश्रा आणि सक्षम हंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Previous Articleकाँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला! ‘करवीर’चे आमदार पी. एन. पाटील- सडोलीकर यांचे निधन; काँग्रेस कार्यकर्त्यांना जबर धक्का
Next Article डेपो टायगर्स, ड्रॉपिन वॉरियर्स संघ विजयी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.