ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बीएमडब्ल्यू इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुद्रतेज सिंह यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 46 वर्षाचे होते.
बीएमडब्ल्यू इंडियाच्या प्रमुखपदी नियुक्त झालेले सिंह हे पहिले भारतीय होते.
BMW ने सिंह यांना 1 ऑगस्ट 2019 रोजी भारतात सीईओ म्हणून नियुक्त केले होते. सिंह रूडी नावाने प्रसिद्ध होते. बीएमडब्ल्यूमध्ये येण्यापूर्वी ते सिंह रॉयल एनफिल्डच्या समूह अध्यक्षपदी नियुक्त होते. BMW कंपनी भारतात डीलर नेटवर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असताना सिंह यांचे निधन झाले आहे, असे कंपनीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.