बेंगळुरू: काँग्रेस सरकारच्या 5 हमी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज सादर करणे थोडे पुढे ढकलण्यात आले आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन अर्ज सादर करण्यास ४ ते ५ दिवस उशीर होणार असल्याचे सांगितले.बापूजी सेवा केंद्र, ग्रामपंचायती, नाड कार्यालयात अर्ज करण्यास परवानगी देण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. अर्ज तयार करण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने अर्ज सादर करणे पुढे ढकलण्यात यावे, अशी सूचना वरिष्ठांनी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करण्याची परवानगी आहे. सेवासिंधू अँप, ग्राम वन, बेंगलोर वन, कर्नाटक वन, नाड कचेरी येथे जाऊन अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. तसेच ई-गव्हर्नन्सला गृहलक्ष्मी योजनेसाठी नवीन अँप तयार करण्यास सांगितले असून यासाठी 4-5 दिवसाची मागणी केली करण्यात आली आहे. याशिवाय स्वयंसेवी संस्थांनाही आमंत्रित करण्यात आले असून त्यांनी 4-5 दिवसांचा वेळही मागितला आहे. मंत्रीमंडळातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून मंत्रीमंडळाच्या सदस्यांच्या सल्ल्याने गृहलक्ष्मी योजनेचे अर्ज सादर करण्याचे काम ४ ते ५ दिवस पुढे ढकलण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Previous ArticleKarnataka news : अन्न भाग्य योजनेसाठी केंद्राकडून आडथळा; योजना अशस्वी करण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न- मुख्यमंत्री सिद्धरामय्या
Next Article Kolhapur : शाहू सलोखा मंचतर्फे शनिवारी सलोखा बैठक