वृत्तसंस्था/ सेऊल
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या कोरिया खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या 19 वषीय एम्मा रॅडुकानूने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना मॅग्डा लिनेटचा पराभव केला.
शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रॅडुकानूने लिनेटचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. गेल्या वषी रॅडुकानूने अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकाविले होते. तिने शुक्रवारी आपला सामना 77 मिनिटांत जिंकून शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. उपांत्य फेरीत तिची गाठ ओस्टापेंको आणि व्हिक्टोरिया कॅसिनत्सेव्हा यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर पडेल.