अखेर नेपाळच्या सीमेवर अटक
रत्नागिरी प्रतिनिधी
ठाणे रेल्वेस्टेशननजीकच्या हॉटेलवर वृद्धाचा निर्घृणपणे खून केल्यानंतर आरोपीने काही दिवस रत्नागिरीत आश्रय घेतल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे पोलीस आपल्या अटकेसाठी रत्नागिरीत आल्याचा सुगावा लागताच या आरोपीने जिह्यातून पळ काढल़ा अखेर ठाणेनगर पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील भारत-नेपाळ सीमेवर आरोपीच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिल़ी
राजन शर्मा (20, ऱा उत्तरपदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आह़े पैशाच्या हव्यासापोटी प्रिन्स हॉटेलमध्ये कार्यरत असलेल्या राजन शर्मा याने 27 मे 2023 रोजी 65 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आह़े पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राजकोट येथील रहिवासी काराभाई सुवा हे काही व्यवसायासाठी प्रिन्स हॉटेल येथे आले होत़े 27 मे 2023 रोजी हॉटेलच्या 303 कमांकाच्या खोलीत काराभाई यांचा मृतदेह आढळला होत़ा तपासाचा एक भाग म्हणून हॉटेल कर्मचाऱयांची चौकशी करण्यात आली. त्या दरम्यान राजन शर्मा हा हॉटेलचा कर्मचारी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल़ी पोलिसांकडून राजन याचा शोध घेण्याचा पयत्न करण्यात आला असता राजनने वृद्धाचे एटीएम वापरून 80 हजार रूपये काढले होत़े तसेच त्याने रत्नागिरीत आश्रय घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाल़ी त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे व निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱयांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले होते. हे पथक राजनला ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाले हेत़े मात्र राजनला अधीच पोलिसांचा सुगावा लागल्याने त्याने रत्नागिरीतून कर्नाटक येथे पळ काढल़ा.
या बाबत ठाणे झोन-1 चे डीसीपी गणेश गावडे यांनी सांगितले की, पोलिसांच्या पथकाने राजन याचा कर्नाटकात पाठलाग केला, पण तो पुन्हा पळण्यात यशस्वी झाला. यानंतर राजन हा उत्तरप्रदेशातील त्याच्या गावी जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढत आहे. कर्नाटकातून रेल्वे नागपूर रेल्वेस्थानकावरून जात असल्याने पोलिसांची टीम नागपूरला गेली, पण तिथेही तो हाती लागला नाह़ी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजन हा उत्तरपदेश येथील गोरखपूरला असल्याचे सांगण्यात आल़े मात्र येथेही चलाखी दाखवत राजन हा गुप्तपणे नेपाळला गेल्याची माहिती समोर आल़ी यानंतर पोलिसांना खात्रीशीर खबऱयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजन 5 किंवा 6 जून रोजी उत्तरप्रदेशात परतण्याचा प्रयत्न करेल. राजन याच्या याचवेळी मुसक्या आवळायाच्या म्हणून पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवर रणनीतिकरित्या सापळा रचला. 26 तासांच्या विस्तृत प्रयत्नानंतर या कारवाईत राजनला पोलिसांनी पकडले, अशी माहिती गावडे यांनी दिल़ी.
पैशाच्या हव्यासापोटी केला खून
राजन शर्मा याने पैशाच्या लालसेपोटी वृद्धाचा खून केल्याची कबुली पोलिसांपुढे दिल़ी विशेष म्हणजे मृत काराभाई सुवा हे कामानिमित्त ठाण्यात आल्यास पिन्स हॉटेलवर थांबत असत़ नेहमीच्या परिचयातील असलेल्या राजन याच्यावर काराभाई यांनी विश्वास ठेवला होत़ा तसेच डेबीट कार्डचा पासवर्ड देखील राजन याला सांगितला होत़ा काराभाई यांच्या खात्यात भरीव रक्कम असल्याचे निदर्शनास येताच त्यांचा खून करण्याचा प्लॅन राजन याने आखल्याची कबुली दिल़ी