वेवकोटा चषक 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
एमसीसी क्लब आयोजित वेवकोटा चषक 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत बीएससीने एमसीसी संघाचा 105 धावांनी, रॉजर्स संघाने एमसीसी संघाचा 109 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. आरुष पुत्रण (बीएससी) व सोहम चव्हाण (रॉजर्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आल.
होनगा येथील फिनिक्स स्कूलच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेत पहिल्या सामन्यात बीएससीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 1 गडी बाद 173 धावा केल्या. त्यात आरुष पुत्रणने 12 चौकारांसह 80 धावा केल्या. लक्ष खतायतने 6 चौकारांसह 33 तर इम्तिहाज मंडलने 4 चौकारांसह 29 धावा केल्या. एमसीसीतर्फे शामीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसीने 20 षटकात 5 गडी बाद केवळ 54 धावाच केल्या. त्यात अब्रारने 28 धावा केल्या. बीएससीतर्फे अवनीनने 3 सुजलने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात रॉजर्स क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 166 धावा केल्या. त्यात सोहम चव्हाणने 7 चौकारांसह 42, जोया काझीने 7 चौकारांसह 41, अवनीशने 22 धावा केल्या. एमसीसीतर्फे अब्रार व शामी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसीचा डाव 16 षटकात 54 धावात आटोपला. त्यात मयांकने 1 षटकार 3 चौकारांसह 23 तर अथर्वने 11 धावा केल्या. रॉजर्सतेर्फ परिक्षितने 2 गडी बाद केले.
शनिवारचे सामने – चॅलेंज स्पोर्ट्स निपाणी वि. बेळगाव स्पोर्ट्स क्लब स. 8.30 वा., रॉजर्स क्रिकेट क्लब वि. चॅलेंज स्पोर्ट्स निपाणी दु. 1 वा.