पत्रकार परिषदेत राज्य प्रधान कार्यदर्शी कल्लाप्पा थोरवी यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
बहुजन समाज पार्टीच्या मेळाव्यासाठी आंदोलन राबविण्यात येणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन दि. 27 डिसेंबर रोजी बेंगळूर येथे होणार असून पक्षाचे समन्वयक आकाश आनंद उपस्थित राहणार आहेत. यावेळी बेळगावसह जिह्यातील एक हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीच्यावतीने बेळगाव विभागासाठी 27 जागा लढविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बहुजन समाज पार्टीचे राज्य प्रधान कार्यदर्शी कल्लाप्पा थोरवी यांनी दिली.
तसेच बेंगळूर येथे झालेल्या आंदोलनावेळी सरकारने बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कृतीचा पार्टीच्यावतीने निषेध करण्यात येत असून सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत आणि माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच बेंगळूर येथे होणाऱ्या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले. यावेळी पार्टीचे जिल्हाध्यक्ष यमन्नाप्पा तळवार, गोकाक विधानसभा विभागाचे लोहित व गजानन कोलकार उपस्थित होते.