राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर प्रमुख केंद्रिय नेत्यांनी आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मु यांनी हिंदीत ट्विट करताना बुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर, मी सर्व देशवासीयांना आणि जगभरातील भगवान बुद्धांच्या अनुयायांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देता असा संदेश दिला आहे. तर आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. भगवान बुद्धांचे आदर्श आम्हा सर्वांना प्रकाश आणि शक्ती देतराहोत असे म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या संदेशात “सर्व देशवासियांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा आणि करुणेचा संदेश दिला. त्यांचे जीवन आणि शिकवणी आम्हाला प्रेरणा देत राहतील.” असा संदेश दिला आहे.
भगवान गौतम बुद्धांनी दाखवलेला सत्य, अहिंसा आणि तपश्चर्याचा मार्ग संपूर्ण जगाला शांती, प्रेम आणि सौहार्दाच्या दिशेने चालण्याची प्रेरणा देतो, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये “बुद्ध पौर्णिमेच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा,” असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.