दापोली प्रतिनिधी
दापोली शहरातील मधील घर फोडून सुमारे 14 लाख 53 हजार 950 रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 च्या सुमारास घडली. यास्मिन हवा (42) फिर्यादीत दिली.
या संशयीतांनी प्रवेश करून घरातील लोखंडी पेटीमध्ये असणारी रोख रक्कम तसेच खोलीमधील सोने व चांदीचे दागिने व दैनंदिन वापराच्या वस्तू व अन्नपदार्थ यावर डल्ला मारला. दागिने रोख रक्कम तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू सोफा वॉशिंग मशीन लॅपटॉप यांचाही यामध्ये समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यास्मिन हवा याच्या संमतीशिवाय स्वतच्या फायदा करिता लबाडीच्या इराद्याने सर्व मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सुमारे 14 हजार 53 हजार 950 रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी संशयित म्हणून नासिर वजीर चिपळूणकर, बाकीर चिपळूणकर, वजीर चिपळूणकर, रऊफ काजी, शाहरुख चौले यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक गंगधर करीत आहेत.