सावंतवाडी/ प्रतिनिधी –
सालईवाडा येथील सर्वोदयनगर आणि नवीन शिरोडा नाका येथे दोन बंद घरांवर चोरटयांनी डल्ला मारला. मंगळवारी सकाळी चोरीचा प्रकार उघड झाला घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले शिरोडा नाकाजवळील बंगल्यातील श्रीराम बोअरवेल सर्व्हिसचे सामान विस्कटून आतील सीसीटीव्ही कॅमेरे, फुटेज, डीव्हीआर लंपास झालं तर ,सर्वोदयनगर येथील राजू घाटगे हे मुंबईला असतात. त्यांच्या घरातून कोणता ऐवज लंपास झाला हे उघड झाले नाही