कोल्हापूर विभागात वैष्णवी सबनीस प्रथम, निहार कुलकर्णी व साक्षी जठार व्दितीय आणि श्वेता फडतारे तृतीय क्रमांक मिळवला
कोल्हापूर प्रतिनिधी
नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)च्या वतीने मे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सी. ए. अंतिम परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. या परीक्षेत कोल्हापूर विभागातून 285 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोल्हापूर विभागात वैष्णवी सबनीस यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर निहार कुलकर्णी व साक्षी जठार यांनी व्दितीय आणि श्वेता फडतारे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. यंदाही सी. ए. परीक्षेत कोल्हापुरच्या विद्यार्थ्यांनी झेंडा फडकवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
सी. ए. परीक्षेत कोल्हापूर विभागातून अभय पोवार, शब्दश्री घोडके, साई मुधाळे, अपूर्वा पाटील, प्रथमेश काणेकर, शुभांगी साळोखे, रमण कामत, राहुल पाटील, ऐश्वर्या हंजे, सिद्धी कुलकर्णी, प्रियांका दळवी, हर्ष भानुशाली, प्रथमेश साळोखे, मृदुला जोशी, अर्णव माने, अर्जुन कतार, सुमितकुमार अगरवाल, स्नेहल ओसवाल, ओंकार नरगट्टे, अनिरूध्द कुलकर्णी, तेजस्वीनी शेळके, शरण्या शेट्टी, अभिमन्यू पाटील, अमृता पाटील, आविनाश पाटील, अफरिन उस्ताद, साक्षी जाधव, सौरभ महेकर, बिहरीलाल कुकरेजा, कौस्तुभ रेडीज, यश शहा, प्रगती पाटील, चंद्रकांत फबियाणी हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे प्रत्येक वर्षी मे व नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येणारी सी. ए. परीक्षा अवघड असते. त्यामुळे परीक्षेचा निकाल फार कमी लागतो. कोल्हापुरच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.