वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ला येथील कॅम्प कॉर्नर नवरात्रोत्सव मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश येरम तर उपाध्यक्षपदी रमेश परब यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.वेंगुर्ले शहरातील कॅम्प कॉर्नर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. गेली 24 वर्षे हे मंडळ नवरात्र उत्सवाचे आयोजन करत असून यावर्षीच्या उत्सवासाठी मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये खजिनदार पदी सुशील परब, सहखजिनदार पदी देविदास वालावलकर, सचिव पदी नेल्सन मोंतेरो, सहसचिव पदी विलास परब, सल्लागार पदी अँड. नारायण उर्फ शाम गोडकर, डॉ. अनिल वनकुद्रे यांची निवड करण्यात आली. यावेळी आनंद शिरोडकर, महेश टेमकर, मनीष रेवणकर, निलेश वराडकर, सिल्वान डिसोजा, गुणाजी परब, नारायण फटजी, विल्सन डिसोझा, श्याम वालावलकर यांच्यासह ४५ सदस्य उपस्थित होते.
दि. १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होणाऱ्या या नवरात्र उत्सवात दि. १५ रोजी नवदुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून उत्सव कालावधीत भजन, दांडिया, रेकॉर्ड डान्स, वेशभूषा स्पर्धा, आर्केस्ट्रा, जादूगार यासारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमांचा भाविक व रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.