रिलायन्स मोठी योजना आखण्याच्या तयारीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा अध्यक्ष मुकेश अंबानी हे आता कॅम्पा कोलाची विक्री भारताबाहेर करण्याची योजना आखत आहे. रिलायन्स रिटेलच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या की, कॅम्पा कोलाला देशातील लोकांचे खूप मोठे प्रेम मिळाले आहे. लोकांमध्ये याबाबतची क्रेझ पाहून कंपनीला आता इतर देशांमध्येही आपला प्रसार व विस्तार करायचा आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने आता कॅम्पा कोला फ्रेंडला आशिया आणि आफ्रिका सारख्या खंडांमध्ये नेण्यासह जागतिक स्तरावर नेण्यास सुरुवात केली आहे.
सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46 व्या एजीएममध्ये बोलताना ईशा अंबानी म्हणाल्या की, कॅम्पा कोला भारतात या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आला होता आणि त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हे लक्षात घेऊन, आरआयएलचा पॅकेज केलेला ग्राहकोपयोगी वस्तूंचा ब्रँड आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने कॅम्पा कोलासाठी महत्त्वाकांक्षी योजना आखल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, कॅम्पा कोला आपल्या बाटलीतील पेयाची क्षमता वाढवण्याचा विचार करते आहे.