बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. यामध्ये कॅन्टोन्मेंटच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही सामावून घेऊन पेन्शन वाढीसाठी प्रयत्न करावा, या मागणीसाठी बुधवारी पेन्शनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सीईओ राजीव कुमार यांची भेट घेतली. कॅन्टोन्मेंट बोर्ड पेन्शनर्स धारकांचे सातव्या वेतन आयोगासाठी न्यायालयीन लढा सुरू आहे. तसेच पेन्शनर्स धारकांना इतर सेवासुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डचे मनपामध्ये हस्तांतरण झाल्यास पेन्शनर्स धारकांनाही सामावून घेऊन त्यांना सेवासुविधा पुरविण्याची मागणी सीईओंकडे करण्यात आली. सीईओ राजीव कुमार यांनी पेन्शनर्स धारकांचे म्हणणे ऐकून घेत आपण संरक्षण मंत्रालयाला पेन्शनर्स धारकांची मागणी पोहोचवू, असे आश्वासन दिले. यावेळी पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल पोलो, कविता दानवडे, जी. एम. मोकाशी, मुरनाळ, भरमा चौगुले, निलप्पा कांबळे, गोपाळ कांबळे, वामन सुतारसह इतर उपस्थित होते.
Previous Articleधुमाकूळ घातलेला हत्ती परतीच्या मार्गावर
Next Article अगसगे ग्राम पं.वर महिलांचा घागर मोर्चा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.