नवी दिल्ली
कॅपिटललँड इंडिया ट्रस्ट येत्या काळामध्ये पुण्यामध्ये आयटी पार्क खरेदी करण्याच्या योजनेवर विचार करत आहे. सदरची आयटी पार्कची खरेदी ही 1350 कोटी रुपयांना केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या खरेदीसंदर्भात कॅपिटललँड इंडिया ट्रस्ट तसेच इकोस्पेस आयटी पार्क यांच्यामध्ये करार लवकरच होणार असल्याचे सांगितले जात आहे. हिंजवडी, पुणे येथील आयटी पार्कची पूर्णपणे हिस्सेदारी कॅपिटललँड इंडिया घेणार असल्याचे सांगितले जाते. 23 लाख चौरस फूट क्षेत्रफळामध्ये चार इमारती उभारण्यात आल्या असून या इमारती आयटी पार्क अंतर्गत येत असून त्यांचा ताबा अधिग्रहण पूर्ण झाल्यावर कॅपिटललँड कंपनी घेऊ शकणार आहे.