लोणावळा : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एक डस्टर कार अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. पुणे मार्गिकेवर ही दुर्घटना घडली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्गावरील देवदूत यंत्रणा व आयआरबी पथकाने घटनास्थळी धाव घेत सदर आग विझवण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांमध्ये एक्स्प्रेस वेवर अनेक वाहने जळून खाक झाली आहेत.