दुसरा मानांकित टेनिसपटू कार्लस अल्कारेझने चीन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये यानिक हान्फमन याच्यावर पहिल्या फेरीमध्ये 6-4, 6-3 असा सफाईदार विजय मिळविला. या विजयामुळे अल्कारेझ याचा आत्मविश्वास वाढला असून अमेरिकन ओपन टेनिसनंतर मिळविलेला पहिला विजय आहे. त्याची पुढील फेरी आता लोरेंझो मुसेटी याच्याबरोबर आहे.
त्याचबरोबर तिसरा मानांकित व अमेरिकन टेनिस स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेला खेळाडू मेदव्हेदवने टॉमी पॉलवर 6-2, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये विजय मिळविला. व पुढील फेरीत प्रवेश केला. मेदव्हेदवने मागील चार हंगामानंतर प्रथमच चीन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. व पहिल्या फेरीत आपली चमक दाखविली. पुढील फेरीत त्याची गाठ आता अलेक्स डी मिनॉर याच्याबरोबर आहे.