पंचवीस चित्ररथांचा सहभाग : हवेत फुगे सोडून जल्लोषात सुरुवात
पर्वरी : गोवा पर्यटन खात्यातर्फे यंदा प्रथमच पर्वरीत शुक्रवारी कार्निव्हल मिरवणूक काढण्यात आली. शुभारंभी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, साळगाव मतदारसंघाचे आमदार केदार नाईक, भाजप गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानवडे, मांद्रे मतदारसंघ आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत हवेत फुगे उडवून मोठ्या जल्लोषात सुऊवात झाली. ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश देणारा हा उत्सव दि. 17 ते 21 असे तीन दिवस गोव्यातील प्रमुख शहरांत साजरा होणार आहे. गोवा हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने आणि पर्यटकाना आकर्षित करण्यासाठी हा उत्सव आम्ही साजरा करतो. यंदा पहिल्यांदाच या उत्सवाची सुऊवात पर्वरीतून होत आहे. या मंतदारसंघाचा आमदार आणि पर्यटनमंत्री असल्याने मला खूप आनंद होत आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.यावेळी कार्निव्हल मिरवणुकीत पारंपरिक, सामाजिक संदेश देणारे, वैयक्तिक तसेच वेगवेगळ्dया क्लबातर्फे सुमारे 25 चित्ररथ सहभागी झाले होते. आययचएम ते आझाद भवन या मार्गावय या मिरवणूक काढण्यात आली. दारू पिऊन वाहन चालवू नये, शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरणाचे संवर्धन, असे विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथांद्वारे देण्यात आले. चित्ररथ मिवणुकीचा आनंद घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.