ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांना चांगलेच भोवले. एका महिलेने जाधव यांच्याविरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. या व्हिडिओत हर्षवर्धन जाधव हे अमित शाह आणि चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर वक्तव्य करताना दिसत होते. शाह आणि पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर अशी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी महिलेने दत्तवाडी पोलिसांत यासंदर्भात तक्रार नोंदवली. त्यानुसार जाधव यांच्यावर भारतीय दंडात्मक कलम 354 (अ), 509, 501, 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : पालघर हादरलं! अल्पवयीन मुलीवर 11 जणांकडून सामूहिक बलात्कार