आज देशभरात सांख्यिकी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्र सरकार २००७ सालापासून दरवर्षी २९ जून हा दिवस सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करते.
सांख्यिकी तज्ञ दिवंगत प्रा. प्रशांत चन्द्र महालनोबिस यांच्या जयंती निमित्त हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. यंदा ‘सांख्यिकी विकासात सातत्य’ ही सांख्यिकी दिवसाची संकल्पना ठरविण्यात आली आहे. सामाजिक आणि आर्थिक योजनांमध्ये तसंच देशाच्या विकासात आकडेवारीचं महत्त्व याविषयी युवकांमध्ये जनजागृती करणे, अशी या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.