भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कार्यशाळा संपन्न
शासकिय कार्यालयात असणाऱ्या विविध सोईंचा विचार करून देण्यात येणारे आय.एस.ओ. मानंकर आज सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयास मिळाला आहे. यासंबंधीचे प्रमाणपत्र युनिव्हर्सल इन्फ्रास्क्ट्रचर सर्व्हिसेसचे चौधरी यांनी समाजकल्याण कार्यालयाला आज सुपुर्द केले.
कार्यालयामार्फंत वंचित घटक विशेषत: अनुसूचित जाती व मागासवर्गीय घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विविध कल्याणकारी योजना, कार्यालयातील फर्निचर, संगणक कक्ष, कार्यालयीन व परीसर स्वच्छता. तसेच कार्यालयातील अभिलेखे वर्गीकरण, अधिकारी कर्मचारी वर्ग यांची वर्तवणूक, कार्यालयामध्ये विविध योजनांची माहिती समजणारे सुचना फलक, माहिती प्रसिध्द करणारी माध्यमे याचबरोबरच तृतीय पंथीयांसाठी केलेली स्वतंत्र स्वच्छता गृहे व पिण्याच्या पाण्याची इ सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल कार्यालय़ाला मानांकन प्राप्त झाले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अंतर्गत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र समितीच्या वतीने जिल्हयातील महाविद्यालयांमध्ये समितीमार्फंत जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र तपासून दिली जाईल. त्याच प्रमाणे जिल्हयातील महाविद्यालयांनी तसे नियोजन करुन समितीस कळविलेस त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचेही आश्वासन देण्यात आले.
सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत आज स्वराज्यसंस्थापक छ. शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेकदिनी आय.एस.ओ. मानांकन मिळणे आनंदाची बाब आहे. विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक कक्ष व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांची माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याकरीता प्रचार प्रसिध्दी कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे अवाहन सहायक आयुकत विशाल लोंढे यांनी केले आहे.
शिवराज्यभिषेक सोहळयानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी या महाविद्यालयाचे प्रा. प्रमोद बोभाटे यांचे शिवराज्याभिषेक सोहळयावर व्याख्यान झाले. तालुका समन्वयक सचिन कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने विषयी मार्गदर्शन केले. याा कार्यशाळेमध्ये 10 लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.