नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत 27 टक्क्यांनी वाढून 318 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बुडीत कर्जे कमी झाल्याने बँकेचा नफा वाढला असल्याची माहिती बँकेने यावेळी दिली आहे. बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत तिने 250 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.