चैत्र यात्रेनिमित्त बेळगाव शिवबसव नगर येथील श्री जोतिबा मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
आज बुधवारी दि. ५ रोजी सकाळी अभिषेक, आरती विशेष पूजा करण्यात आले. श्री जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. जोतिबाच्या नावानं चांगभलं… आई यमाईच्या नावानं चांगभलं या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला.
देवालयात बुधवारी 5 रोजी सकाळी अभिषेक आरती विशेष पूजन तर रात्री 8 वाजता महाआरती करण्यात येणार आहे.10 एप्रिल रोजी बेळगावात सासनकाठी आल्यावर शिवबसब नगर जोतिबा देवालय परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.