प्रतिनिधी/कुडचडे
दयानंद कला केंद्र कुडचडेतर्फे चंदेरी महोत्सवात आयोजित केलेल्या ’चंदेरी राणी’ 2022 निवड स्पर्धेत सौ. श्रध्दा नाईक शिरोडकर फोंडा हिने चंदेरी राणी चषक जिंकला तर सिया भोंसले कुडचडे हिला दुसरा नंबर आणि शुभांगी गुरव – तिसरा नंबर मिळाला.
विजयी महिलांना गोवा राज्याचे माजी कला व संस्कृती संचालक मोर्तू नाईक यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना चंदेरी राणी मुकूट घालण्यात आले. सौ. सिमरन हळर्णकर व अनिक्षा कवळेकर ह्या दोघांनी मिळून परिक्षण व मुलाखती घेतल्या. ह्या स्पर्धेत एकूण 9 महिलांनी निवड चाचणीत भाग घेतला.
स्पर्धेच्या सुरवातीला सिमरन हळर्णकर लोटलीकर साखळी हिने सर्वाना निवड स्पर्धेविषयी चालणे प्रात्यक्षिक आणि स्पर्धेचे नियम विस्ताराने सांगितले. बंटी उडेलकर यांनी स्पर्धेचे सुत्रसंचालन केले उपस्थित प्रेक्षकांनी सर्वाना टाळय़ांनू उत्तेजीत केले. अशी ही वेगळय़ाच प्रकारची स्पर्धा कुडचडय़ात भव्य खुल्या रंगमंचावर पार पडली.