रूम बुकिंगच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक
प्रतिनिधी/रत्नागिरी
गणपतीपुळेमधील हॉटेलच्या नावाचा बनावट ईमेल आयडी तयार करुन रुम बुकिंगच्या नावाखाली 29 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हॉटेल ग्रिनलिफ द रिसॉर्ट गणपतीपुळे येथे घडली. या बाबतची तक्रार हॉटेलचे व्यवस्थापक पंकज नेमाडे याने जयगड पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपतीपुळे येथील ग्रिनलिफ हॉटेलच्या नावाने अज्ञाताने गुगल मॅप या सर्च इंजिनवरील बिझनेस लिस्टमध्ये प्रोफाईल व्यवस्थापनासाठी मेसेज पाठवला. मेसेज ऍक्सेप्ट होताच अज्ञाताने हॉटेलमधील गुगल मॅप सर्च इंजिनवरील बिझनेस लिस्टमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवला. त्यानंतर अज्ञाताने हॉटेलचा संपर्क क्रमांक बदलून आपला मोबाईल नंबर व स्व:ताचा ईमेल ॲड्रेस अपलोड केला. यानंतर अज्ञाताने हे हॉटेल आपलेच असल्याचे भासवून हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना रुम बुक करण्यासाठी 29 हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले.
ग्राहकांनी हॉटेलमध्ये येऊन चौकशी केली असता त्यांचे बुकींग झाले नसल्याचे दिसून आले. त्यानंतर पंकज नेमाडे यांनी ईमेल ॲड्रेस व मोबाईल नंबरची खात्री केली असता दोन्हीही बदललेले दिसले. ग्राहकांची व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नेमाडे यांनी जयगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर भादंविकलम 419, 420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 43 (फ), 66 (क), 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत.
हे ही वाचा : पाटीलबुवाच्या खटल्याची आता २५ नोव्हेंबरला सुनावणी
दरम्यान अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने देखील आपले पती प्रमोद प्रभुलकर व मुलगी स्वराली ही गणपतीपुळे येथील हॉटलेवर गेले होत़े यावेळी हॉटेलवर त्यांचे बुकींग नसल्याचे त्यांना सांगण्यात आल़े याप्रकारामुळे त्यांची देखील फसवणूक झाली असल्याबाबत फेसबुक पोस्ट केली आह़े आपण त्या दिवशी त्यांच्यासोबत गेलेला नव्हत़ो तर मधुराणी यांची छोटी सर्जरी असल्याने त्यांनी मालिकेतून रजा घेतली होत़ी तसेच त्या पुणे येथील आपल्या घरीच होत्या असे त्यांनी सांगितले आह़े.
असे असले तरी पती व मुलीबाबत घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे मधुराणी यांनी म्हटले आह़े. या सर्व प्रकारामुळे कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच पती प्रमादे यांची देखील तब्येत बिघडली आह़े. सध्या दोघेही सुखरूप असून अनेक जणांची अशा प्रकारे ऑनलाईन हाॅटेल करण्यात फसवणूक झाली असण्याची शक्यता आह़े. या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून लवकरात लवकर तपास करण्यात यावा तसेच फसवणूक झालेल्यांना त्यांचे पैसे परत मिळावेत, असे मधुराणी प्रभुलकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटले आह़े.