Charatha School celebrates Reading Inspiration Day
पाठ्यपुस्तकातील धडा तसेच कविता वाचन करत माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विषयी कविता लिहून ती काव्यमय पंक्तीत त्याचे वाचन करत अनोख्या पद्धतीने चराठा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेतील मुलांच्या समवेत मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे लेखक कवी साहित्यिक पत्रकार शिक्षक अन विद्यार्थी यांची अनोखी भेट संगम घडवला . अन वाचन संस्कृती आणि साहित्य चळवळ पुढे नेण्याच्या दृष्टीने वेगळ्या पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला या गावचे सरपंच रघुनाथ उर्फ बाळू वाळके यांनी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने चराटा शाळेतील मुलांना लेखक कवी साहित्य यांची भेट घडवून आणत त्यांना खऱ्या अर्थाने वाचन व साहित्याची गोडी लागावी यासाठी राबवलेला उपक्रम वाखाण्याजोगा आहे. आणि खऱ्या अर्थाने वाचन प्रेरणा यातून त्यांना प्राप्त करून दिली आहे असे गौरव उद्गार काढले सावंतवाडी येथील कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे गाव व शाळा तेथे कोमसाप व लेखक साहित्यिक कवी पत्रकार भेटीला असा उपक्रम हाती घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम चराटा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत दीप प्रज्वलन करून साजरा करण्यात आला.
सावंतवाडी / प्रतिनिधी