शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात यात्रा उत्साहात
बेळगाव : वाडी रत्नागिरी कोल्हापूर जोतिबा येथील चैत्र पौर्णिमा यात्रा करून चव्हाट गल्ली देवदादा सासनकाठी शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिर परिसरात रविवारी दाखल झाली. यावेळी या यात्रेची सांगता करण्यात आली. याप्रसंगी आंबिल घुगऱ्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी देवदादा मठ येथून दिंडी आणि बैलगाड्या वाजत गाजत गुलालाची उधळण करून चव्हाट गल्ली येथे दाखल झाल्या.