पणजी : ‘अबकी बार 400 पार’, ‘फिर एक बार मोदी सरकार’, अशा घोषणा देत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी उत्तर कन्नड जिह्यातील कारवार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचार मोहिमेत सहभाग घेतला. भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांच्या प्रचारानिमित्त कागेरी येथे भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. त्या मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.यावेळी बोलताना त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमुळे देशाचा प्रचंड गतीने विकास होत असल्याचे सांगितले. या विकासरथाची घोडदौड अशीच कायम राहायची असेल तर प्रत्येक भारतीयाने मोदींचे हात बळकट करणे गरजेचे आहे. या कार्यात कर्नाटकातील लोकांनीही खारीचा वाटा उचलावा व आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या रोड शो मध्ये भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Previous Articleकेवळ स्वप्ने पाहून मते मिळत नाहीत
Next Article सांगोल्डातील 12 बेकायदा घरांवर बुलडोझर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.