चिकोडी अंकली मार्गावर बसवनाळगड्डे नजीक अपघात
चिकोडी/प्रतिनिधी: दुचाकी व गुड्स गाडीची समोरासमोर धडक झाल्याने तिघे युवक ठार झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील अंकली चिकोडी मार्गावर बसवनाळ गड्डे नजीक मंगळवारी रात्री 10 वाजता घडली.प्रशांत भैरू खोत (वय 21, राहणार : रुपीनाळ), सतीश कल्लाप्पा हिरीकुडे (वय 28 ,राहणार :केरूर) व यलगौडा चंद्रकांत पाटील (वय 23, राहणार देवगिरी बेळगाव) अशी मृत्यू झाल्याची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून व रहदारी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की केरुर येथील महालक्ष्मीची यात्रा मोठ्या उत्साह सुरू झाली असून या यात्रेसाठी युवक आले होते. काही कामानिमित्त तीन युवक दुचाकी( केए 50 आर 5097) या वाहनावरून रात्री चिकोडीला आले होते. केरुरकडे परत जात असते वेळी बसवनाळ गड्डे येथे चिकोडीकडे येत असलेल्या मिनी गुड्स (एमएच 10 डीटी 1391) गाडीला धडक झाली. त्यात प्रशांत व सतीश या दोघांचा जागीच मुत्यू झाला. यलगौडा पाटील हा जखमी असल्याने त्याला चिकोडी हॉस्पिटलमध्ये दाखल करून बेळगावला सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन जात असते वेळी त्यांचाही वाटेत मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चिकोडी ट्राफिक पोलीस व ग्रामीण पोलीस स्थानकाचे पीएसआय ए. टी. अमिन भावी यांनी महादेव कांबळे व आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. तसेच गुड्स वाहन चालकाला ताब्यात घेतले. सकाळी चिकोडी येथील सरकारी आरोग्य केंद्रात विच्छेदन करून मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद चिकोडी रहदारी पोलीस स्थानकात नोंद झाली असून यात्रेकरूंच्यावर काळाचा घाला आल्याने केरुर येथील नागरिकांतून हळ व्यक्त होत आहे.