दररोज मोजक्याच नागरिकांना टोकन : आधार केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
आधार नोंदणीसाठी शहर तसेच तालुक्मयातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. खासगी ठिकाणी अधिक रक्कम द्यावी लागत आहे तर काही निवडक सरकारी कार्यालयांमध्ये रांगा लागत आहेत. त्यामुळे दिवसभर या रांगांमध्ये थांबून नागरिकांना आधार नोंदणी करावी लागत आहे. त्यामुळे आधार केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शहरात काही मोजक्मयाच कार्यालयांमध्ये आधार नोंदणी होत आहे. बेळगाव वनसह पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केली जात असल्याने तेथे मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात आधार नोंदणीसाठी स्वतंत्र विभाग असल्यामुळे सकाळपासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. दररोज मोजक्मयाच नागरिकांना टोकन दिले जात असून दिवसभरात वेळेनुसार त्यांची आधार नोंदणी केली जात आहे.
कोणत्याही सरकारी योजना असो वा कोणतीही नेंदणी असो, आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे. बऱयाच जणांच्या आधार कार्डवर चुकीच्या जन्म तारखा, चुकीचा पत्ता, नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका असल्यामुळे त्या व्यक्तींना पुन्हा एकदा आधार नोंदणी करावी लागत आहे. याचबरोबर लहान मुलांचे आधार नोंदणी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे.
आधार नोंदणी केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज
बेळगाव शहरात बेळगाव वन, पोस्ट कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केली जाते. मुख्य पोस्ट कार्यालयाव्यतीरिक्त इतर पोस्ट कार्यालयांमध्ये ठरावीकच आधार नोंदणी होत असते. तसेच काही बेळगाव वन कार्यालयांमध्येही कर्मचारी नसल्याने आधार नोंदणी होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील आधार नोंदणी केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.