पणजी ; स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत रस्त्यांची खोदाई चालू झाल्यानंतर पणजीतील सर्व रस्ते धुळीने माखलेले आहेत. प्रदूषण नियंत्र्ण मंडळाने साफ डोळेझाक केल्यानंतर पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर आणि काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी या मंडळाला जागे केले. त्यानंतर पणजीतील रस्त्यांची साफ सफाई करण्याचे काम सोमवारी हाती घेण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाला स्वायत्तता आहे मात्र हे महामंडळ सरकारच्या दबावाखाली का वावरते हेच कळत नाही. पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली पणजीतील रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा कऊन टाकलेली होती पणजीत सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे
परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाला राजधानीतील हे प्रदूषण दिसत नाही. पणजीतील या कारभारात मंत्री बाबूश मोन्सेरात असल्यानेच या महामंडळाने समोर प्रदूषण दिसत असून देखील साफ दुर्लक्ष केले होते. मात्र जागृत नागरिकांनी प्रदूषण मंडळाला सचित्र माहिती देऊन कारवाई करण्यास भाग पाडले. सोमवारी अचानक पणजीत ज्या ठिकाणी खुदाई कऊन रस्त्यावर दगड धोंडे व धुळ टाकून बिनधास्त राहिलेल्या कंत्राटदाराने अचानक पाण्याचा टँकर आणून पाण्याच्या प्रेशरने रस्त्यावरील धुळ काही प्रमाणात काढून टाकली त्याचबरोबर कामगारांनी येऊन रस्त्यावर बिनधास्तपणे पसरवून ठेवलेले दगड धोंडेही बाजूला काढले. महापालिकेला मुळीच जाग येत नाही. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे करायला कंत्राटदाराला भाग पाडले आहे. काही का असेना उदय मडकईकर आणि गिरीश चोडणकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला सचित्र माहिती दिल्यानंतर पणजीत सदर कंत्राटदाराने रस्त्यावरची धूळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रदुषण होऊ नये, यासाठी कोणतीही काळजी सदर कंत्राटदाराने घेतलेली नाही आणि मंडळाने कोणतीही कारवाई सदर कंत्राटदारावर केलेली नाही.