पुणे / प्रतिनिधी :
विदर्भातील अनेक शहरांचा पारा खाली गेला असून, या भागात थंडीची लाट पसरली आहे. पुढील दोन दिवस ही लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, शनिवारी गोंदिया येथे सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
राज्याच्या अनेक भागातील ढगाळ वातावरण तसेच पावसाळी स्थिती कमी झाली आहे. राज्यभर कोरडे हवामान असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यात वाढ झाली आहे. यामुळे विदर्भात थंडीची लाट पसरली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमनात वाढ झाली आहे. विदर्भात पुढील दोन दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अधिक वाचा : शिंदे-फडणवीस सरकार व्हेंटिलेटरवर; फेब्रुवारी महिना बघणार नाही