प्रतिनिधी / बेळगाव
वायव्य पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी सोमवार दि. 13 जून रोजी सकाळी 8 पासून मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी 10 पर्यंत वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी 10.54 टक्के तर, पदवीधर मतदार संघासाठी 8.24 व पश्चिम शिक्षण मतदार संघासाठी 14.16 टक्के मतदान झाले.
वायव्य पदवीधर मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक मेजर पी. मणिवण्णन् यांनी कित्तूर व हिरेबागेवाडी येथील मतदार केंद्रांना भेट देवून पाहणी केली. विश्वेश्वरय्यानगर येथील मतदान केंद्र क्रमांक 28 मध्ये मतदानासाठी गर्दी होती. सदरार्स हायस्कूल येथील मतदान केंद्रांवरही मतदानासाठी रांग दिसून आली.